न्यूज पीसीएमसी नेटवर्क :
पिंपळे गुरव :- पिंपळे गुरव काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचीत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, नरेंद्र बनसोडे, सरचिटणीस करणसिंग गिल, पिंपरी ब्लॉक युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, महासचिव कुंदन कसबे, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक विरेंद्र गायकवाड या सर्व पदाधिकाऱ्यांना संदेश नवले व आबा खराडे यांच्या हस्ते शाल, तिरंगा उपरणे व राहूल गांधीची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते वाय. एस. स्वामी, पाडुरंग तरटे, अजय ताटेल, कृष्णा लोखंडे, राजेश साबळे, श्रीकृष्ण काळे आदी उपस्थित होते.