न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी:- पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धा सेंट ऊर्सला हायस्कुलच्या मैदानावर १८ ते १९ सप्टेंबर रोजी पार पडल्या. यामध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामना विद्यानंदच्याच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये झाला.
यात प्राथमिक विभागाने हा सामना ७-६ असा जिंकून पहिले स्थान पटकावीले. भूमीक पटेल ने ५ तर निर्भय सावंत ने २ गोल केले. माध्यमिक विभागाच्या संघाने द्वितीय स्थान मिळवले.
१७ वर्षे मुले गटात विद्यानंद भवन ने द्वितीय क्रमांक पटकावला. साहिल वाघमोडे ने ७ तर यशोधन कुलकर्णी ने ४ गोल नोंदविले. १७ वर्ष मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. या चार संघाला क्रीडाशिक्षक शीतल म्हात्रे, साहेबराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्था अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, संस्था विश्वस्त डॉ. जयसिंग पाटील, डॉ डी आर करनुरे सर, मुख्याध्यापिका छाया हब्बू, सविता किरंगे यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच इतर वैयक्तीक खेळामध्येही विद्यानंद भवन हायस्कूल उत्तम यश मिळवीत आहे म्हणून विद्यार्थी, शिक्षक,पालकांमध्ये खुप आनंदाचे वातावरण आहे.