न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- “ शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात ” या संकल्पनेनुसार प्रत्येक घरात शिवजयंती हा लोकउत्सव साजरा व्हावा यासाठी “घरो घरी शिवजयंती” स्पर्धा १९ फेब्रुवारी २०२४ उपक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व आकर्षक सजावट हा विषय आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी 7218851885 या व्हॉट्सअप क्रमांकवर आपल्या घरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाचा व सजावटीचा सहकुटुंब फोटो, संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवायचा आहे.
त्यातून विजेत्यांची निवड केली जाईल. सदर उपक्रमात वैयक्तिक कुटुंब किंवा संपूर्ण सोसायटी एक कुटुंब म्हणून सहभाग नोंदवू शकेल. दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रात्री ८:०० पर्यंत फोटो पाठवावा, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.














