- अर्थसंकल्पात निधीची तरतूद; जळीत रुग्णांवर होणार त्वरित उपचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी चिंचवडगावातील जुन्या तालेरा रुग्णालयात बर्न हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार जुन्या तालेरा रुणालयात जागेचा नकाशा तयार करण्यात आला आहे. लवकरच संबंधित विभागाकडे अहवाल पाठवून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान एप्रिलपर्यंत बर्न हॉस्पिटलचा विषय मार्गी लागण्याची शक्यता अधिकान्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तळवडे येथील फटाक्याच्या कंपनीत स्फोट झाल्याने १४ कामगारांना आपला जीव गमवावा लागला. जखमी कामगारांना उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णा लयात पाठविण्याची वेळ महापालिकेवर आली. या पूर्वी देखील सातत्याने अशा घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर शहरात बर्न हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र नंतर या चर्चा हवेतच विरत होत्या. तळवडेतील घटनेनंतर विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात आला. त्यानंतर महापालिकेला त्वरीत बर्न वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिका स्तरावर गतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
चिंचवडच्या जुन्या तालेरा रुग्णालयात एप्रिलपर्यंत बर्न हॉस्पिटलचे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. किमान ३० बेडचे सुसज्ज
हॉस्पिटल असावे, असे प्रशासनाचे नियोजन आहे. स्णालयात अत्याधुनिक सुविधा, कक्षाची रचना, मनुष्यबळ आदींबाचत चर्चा करण्यात आली आहे. यानुसार आयसीयू, अत्याधुनिक हायड्रेशन युनिट या बाबींचा समावेश असणार आहे, यासह प्लास्टिक सर्जरीची सुविधा, आयसोलेशन, जंतूसंसर्ग नियंत्रण यंत्रणांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. महिला व पुरुष रुणांसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असाव्यात याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.















