न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरवरील अज्ञात चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुलर्क्ष करुन वाहन हयगयीने अविचाराने, बेदरकारपणे चालवुन युनिकॉन मोटार सायकलला धडक दिली. दुचाकीस्वार तरुणाच्या डोक्यावरून टँकरचे पाठीमागील चाक घातले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.
आरोपी वाहनचालक तरुणाच्या मृत्यूस कारणीभुत झाला. तसेच टँकर सोडुन घटनास्थळावरून पळुन गेला. अमोल प्रकाश काकडे (वय ३८ वर्षे रा. पिंपळे सौदागर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
ही घटना (दि. २१) रोजी सकाळी ०८.५५ ते ०९.१० वा. दरम्यान कुणाल आयकॉन रोड, छत्रपती चौक, पिंपळे सौदागर येथे घडली. सांगवी पोलिसांनी टँकर (एम.एच.४५ १५८४) वरील अज्ञात चालकाच्या विरोधात ५९/२०२४, भा.द.वि २७९, ३०४(अ), मोटार वाहन कायदा कलम १८४,१३२ (१) (क) ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भालेराव पुढील तपास करीत आहेत.














