- अवघ्या अठरा-विशीतील मुलांचा गुन्ह्यात सहभाग..
- पालकांनो मुलं सांभाळा; आयुष्य होतंय बरबाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीसांकडून मोठ्या गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर मोक्का, एमपीडीए व तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आगामी निवडणुका ह्या भयमुक्त, पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्या यासाठी व्यापक प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत नुकतीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दित अभिलेखावरील गुन्हेगारांविरुध्द वेगवेगळ्या प्रचलित कायद्यानुसार मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.
१. पिंपरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. १२१४/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४ (२७), महा.पो.का. ३७ (१) (३) सह १३५, चे तपासामध्ये आरोपी नामे, (१) सुरज उत्तम किरवले, वय २४ वर्षे, रा. रुम नं. बी. ५ बिल्डींग, स्पाईन रोड, घरकुल, चिखली, पुणे (टोळी प्रमुख) व (२) यश ऊर्फ पाशा कैलास भोसले, वय २१ वर्षे, रा. मोनिता किराणा स्टोअर्स जवळ, आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी, पुणे, (३) अविनाश प्रकाश माने, वय २२ वर्षे, रा. बौध्द विहार, पाण्याच्या टाकी मागे, माताजी मंदीराजवळ, बौध्दनगर, पिंपरी पुणे (४) गणेश जमदाडे, रा. भाटनगर, पिंपरी पुणे, यांचेविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण ०६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
२. वाकड पोलीस ठाणे, गुरजि. नं. ६६/२०२४ भादंवि ३९५, ४२७, आर्म अॅक्ट ४, २५, म.पो.का. कलम ३७(१) (३) १३५ सह, क्रिमी लॉ. अमॅटमेन्ट अॅक्ट कलम. ३ व ७ चे तपासामध्ये आरोपी नामे, (१) रोहीत मोहन खताळ, वय २१ रा. दगडू पाटील नगर, लेन नं.३ थेरगाव, पुणे, (टोळी प्रमुख) व (२) साहील हानीफ पटेल, वय २१ रा. आंबेडकर वसाहत, आंबेडकर शाळे शेजारी, वैष्णवी किराणा शॉप जवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे, (३) ऋषीकेश हरी आटोळे, वय २१ रा. बेलठीकानगर, मेडीप्लस मेडीकल समोर, शिवदर्शन कॉलनी, थेरगाव, पुणे, (४) शुभम चंद्रकांत पांचाळ, वय २३ रा. अष्टविनायक कॉलनी, भाग्यश्री निवास समोर, काळेवाडी, पुणे, (५) अनिकेत अनिल पवार, वय २७ रा. बारणे कॉर्नर, पवारनगर, लेन नं. २, थेरगाव पुणे, (६) प्रितम सुनिल भोसले, वय २० रा. लेन नं. १. पिठाचे गिरणीजवळ, आदर्शनगर, काळेवाडी, पुणे, (७) शिवशंकर शामराव जिरगे, वय २२ रा. दत्तनगर, मारुती गुजर चाळ, बिर्ला हॉस्पीटल समोर, थेरगाव, पुणे, (८) सुमित सिद्राम माने, वय २३ रा. शिवराजनगर लेन नं. २. भारत गॅस एजन्सी जवळ, रहाटणी पुणे, (९) गणेश बबन खारे, वय २६ रा. दिसले यांची खोली, दगडु पाटील नगर, लेन नं. ३. अभिनव दुध डेअरी समोर, थेरगाव, पुणे, (१०) अजय भिम दुधभाते, वय २२ रा. डोंगरे कॉर्नर, गणेश मंदीर जवळ, पडवळनगर, लेन नं. ६, थेरगाव, पुणे, (११) मुन्ना एकनाथ वैरागर, वय २१ रा. नागुबाई बारणे शाळेसमोर, पवारनगर, थेरगाव, पुणे, (१२) कैवल्य दिनेश जाधवर, वय १९ रा. उंड्री, स्टार बाजार शेजारी, बी २/१०२, हडपसर, पुणे यांचेविरुध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, व बेकायदेशीर जिवघेणी हत्यारे / अग्निशस्त्रे जवळ बाळगणे, असे एकुण १९ गुन्हे अंबाजोगाई शहर पो. ठाणे. जि. बीड, व अहमदनगर शहर पो. ठाणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
३. निगडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७३७/२०२३ भादंवि. ३०२, ३०७, ४५२, ३२३, ५०६, ३४, १२० ब, आर्म अॅक्ट ४, २५, महा. पो. का. कलम. ३७ (१) (३) १३५ चे तपासामध्ये आरोपी नामे, (१) अमन शंकर पुजारी, वय २२ रा. कोंडीबा चाळ, खोली नं. ९ पांढारकर वस्ती, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे (टोळी प्रमुख) व (२) शिवम सुनिल दुबे, वय २१ रा. पांढारकर चाळ, पाटील दवाखान्याचे पाठीमागे पंचतारानगर, आकुर्डी पुणे, (३) रत्ना मिठाईलाल बरुड, वय ३६ रा. प्रकाश देवडेकर यांचे बंगल्यात, नारायण कॉम्प्लेक्स, पांढारकर वस्ती चौक, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे, यांचेविरूध्द कट करुन खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक हत्यारे जवळ बाळगणे, असे एकुण ०६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
वरील ०३ टोळ्यामधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ मधील कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. तसेच १. वाकड पोलीस ठाणे अभिलेखावरील कुप्रसिध्द गुन्हेगार नामे, संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे, २. दिघी पोलीस ठाणे अभिलेखावरील कुप्रसिध्द गुन्हेगार नामे, अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे, रा. रा. अमरदिप कॉलनी, काळेवाडी, पुणे. एकुण दाखल गुन्हे १४. रा. गणेशनगर कॉलनी क्र. ३. भारतमातानगर, दिघी, पुणे. एकुण दाखल गुन्हे ०३. पिंपरी पोलीस ठाणे अभिलेखावरील कुप्रसिध्द गुन्हेगार नामे, दिपक सुरेश मोहिते, रा. विजयप्रभा हो. ३. सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी, पुणे. एकुण दाखल गुन्हे १० यांच्याविरूध्द पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी वरील ०३ कुप्रसिध्द गुन्हेगारांना एमपीडीए कायद्या अंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणेचे अभिलेखावरील खालील गुन्हेगार यांना तडीपार करण्यात आले आहे.
१ वाकड पोलीस स्टेशन आनंद किशोर वाल्मिकी वय २९ रा. काळा खडक वाकड पुणे, २ महाळुंगे पोलीस स्टेशन संकेत माणिक कोळेकर (वय २२ रा धामणे ता खेड जि पुणे), ३ चिखली पोलीस स्टेशन आकाश बाबु नडविन मणी (वय २१ रा. मोरे वस्ती चिखली), ४ वाकड पोलीस स्टेशन आशिष एकनाथ शेटे (वय २४ रा. नखाते वस्ती रहाटणी पुणे), ५ देहुरोड पोलीस स्टेशन रोहित / गब-या राजस्वामी (वय २२ रा. एमबी कॅम्प देहुरोड), ६ देहुरोड पोलीस स्टेशन रुषिकेश /श-या अडागळे (वय २४ रा गांधीनगर देहुरोड पुणे), ७ पिंपरी पोलीस स्टेशन सुरज रामहरक जैस्वाल (वय २१ मिठु शठे चाळ नेहरुनगर पिंपरी), ८ पिंपरी पोलीस स्टेशन शुभम राजु वाघमारे (वय २२ रा. विठठलनगर नेहरुनगर पिंपरी), ९ पिंपरी पोलीस स्टेशन वृषभ नंदु जाधव (वय २१ रा. इंदिरानगर चिंचवड), १० पिंपरी पोलीस स्टेशन शेखर/बका बाबु बोटे(वय २० रा. इंदिरानगर चिंचवड), ११ पिंपरी पोलीस स्टेशन शुभम अशोक चांदणे वय १९ रा. इंदिरानगर चिंचवड), १२ पिंपरी पोलीस स्टेशन शांताराम मारुती विटकर (वय ३४ रा. इंदिरा नगर चिंचवड), १३ पिंपरी पोलीस स्टेशन अनुराग दत्ता दांगडे (वय १९ रा. इंदिरा नगर चिंचवड), १४ पिंपरी पोलीस स्टेशन सागर ज्ञानदेव ढावरे (वय २० रा. मिलींदनगर पिंपरी), १५ पिंपरी पोलीस स्टेशन पंकज दिलीप पवार (वय ३२ रा आण्णासाहेब मगर चिंचवड), १६ पिंपरी पोलीस स्टेशन सोन्या / महेश श्वेणसिध्द कांबळे (वय २१ रा. दत्तनगर चिंचवड), १७ पिंपरी पोलीस स्टेशन आनंद नामदेव दणाणे (वय ३१ रा विद्यानगर चिंचवड).
सन २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०३ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत व ०३ आरोपींवर एमपीडीए कायद्या अंतर्गत आणि १७ गुन्हेगारांवर तडीपारी कारवाई, असे एकुण ३९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.
सदरची कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, बापु बांगर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०२, डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, वाकड/चिंचवड विभाग, राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण/भोसरी एमआयडीसी विभाग, बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, पिपरी विभाग, डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, यांचे मार्गदर्शनाखाली, निता उबाळे, स.पो.नि., वर्षा जगदाळे, स.पो.नि. पी.सी.बी. गुन्हे शाखा, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, श्रे. पोउनि, सुहास पाटोळे, वाकड पोलीस ठाणे, पो. हवा. शरद विंचु, दिघी पोलीस ठाणे, पो.हवा. गणेश सोनटक्के, निगडी पोलीस ठाणे, पो.ना. ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे यांचे पथकाने केली आहे.















