न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- पुर्वी झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरुन चौघांनी एकत्र येत २७ वर्षीय तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी क्र. ३ याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. परंतु सदरचा वार तरुणाने चुकवत त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेवुन पळ काढला. नंतर चौघे आरोपीतांनी फिर्यादी यांचा पाठलाग करुन थांब, थांब, कुठपर्यन्त पळशील, आज तुला सोडत नसतो. अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ग्रेट पंजाब हॉटेलजवळ, सुझुकी शोरुमच्या समोर, श्रीनगर, रहाटणी याठिकाणी घडली. फिर्यादी आकाश सोमनाथ गोडेपाटील (वय २७ वर्षे, धंदा- डिलीव्हरी) यांनी आरोपी १) आदित्य अहिरराव, २) प्रेम तरडे, ३) प्रतिक माने व त्याचे सोबतचा ४) अनोळखी साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी १९४/२०२४ भा.द.वि. कलम ३०८,३२३, ५०६,३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. १ ते ३ यांना अटक केली आहे. सपोनि गायकवाड तपास करीत आहेत.














