- पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३० जानेवारीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर २६ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षिकांच्या एकूण ६४ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात आतापर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.
२६ तारखेला काढलेल्या बदल्यांच्या आदेशामध्ये पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक गणेश संभाजीराव जवादवाड, कृष्णदेव कल्पना खराडे, अमर रामचंद्र वाघमोडे, शंकर वामनराव अवताडे, अशोक आनंदराव कदम, राम सिद्राम राजमाने, वसंतराव दादासाहेब बाबर, श्रीराम बळीराम पोळ, राजेंद्र जयवंत निकाळजे, रमेश जानबा पाटील या अधिकाऱ्यांची ठाणे शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर, बेडेसाब ईलाई नाईकवाडे (नाशिक शहर), संजय देवदत्त तुंगार (महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक), संतोष महादेव कसबे यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप विठ्ठल जाधव, विशाल गजानन जाधव, अभय खंडेराव दाभाडे, सारंग शिवाजी चव्हाण, समीर शांताराम वाघ, स्पृहा संदीप चिपळूणकर, तौफिक युसुफ सय्यद, राकेश उदेसिंग गुमाणे व मंगल बापुराव जोगन या आठ अधिकाऱ्यांच्या मुंबई शहर पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत. सागर तुळशीदास काटे (सोलापूर शहर), स्वप्नाली दत्तात्रय पलांडे (नाशिक शहर), योगेश सुरेश गायकवाड (औरंगाबाद शहर) येथे बदल्या केल्या आहेत.











