न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- हुक्का चालविण्याचा कोणताही परवाना नसताना हुक्का व हुक्का ओढण्यासाठी लागणारे ज्वालाग्रही सामान बाळगले. त्यापासुन मानवी जिवीतास धोका अथवा इजा होईल याची जाणीव असताना त्याकरीता कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. आरोपींनी लोखंडी बाबेंक्यु इलेक्ट्रीक शेगडी, कोळसा या ३३,६०० रुपयांच्या मालासह मिळुन आले. (दि.२६) रोजी ११.०० च्या सुमारास हॉटेल सी.डॉक, कस्तुरी चौकाजवळ, वाकड येथे पोलिसांनी कारवाई केली.
१) किशोर दिलीप काटे (वय ३८ वर्षे रा. केशवनगर पिंपळे सौदागार), २) अनय प्रभाकर कलाटे (वय २८ वर्षे रा. अक्षरा स्कुलजवळ, विनोदेवस्ती, वाकड), ३) हॉटेलचे आणखी एक मालक (दिनेश सुरेश काटे रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात २१६/२०२४ भा.द.वि कलम २८५, ३४ सह सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा सन २००३ चे कलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.