- चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल; एकजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- मारहाण का केली? अशी विचारणा करण्यासाठी दोघं गेली होती. त्याचा राग आल्याने आरोपी दोघांनी लाकडी बांबुने तर आरोपी ३ याने लाकडी बॅटने व आरोपी ४ याने हाताने व पायाने मारहाण करुन त्याना जखमी केले. तसेच आरोपी ३ याने अली सय्यद (वय २० वर्षे) याच्या डोक्यात जोराने लाकडी बॅटने मारली. त्या मारहाणीमुळे तो मयत झाला.
हा प्रकार (दि. २४) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास बागल चाळ, पंचतारानगर, पांढरकरवस्ती, आकुर्डी येथे घडला. फिर्यादी अल्पवयीन मुलाने आरोपी १) नौशाद हकीबुल्ला साह (वय २१ वर्षे), २) मोहमंद मुबीन हकीबुल्ला साह (वय १८ वर्षे), ३) शमीम हकीबुल्ला साह, ऊर्फ पुल्लु (वय २७ वर्षे), ४) सुजीत सुभाष पाल (वय १८ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ७४/२०२४ भा.द.वि.कलम ३०२,३२४,३२३,३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. पोउपनि सातपुते पुढील तपास करीत आहेत.