- संगिता घोडेकर यांची प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे.
त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील संगिता घोडेकर यांची प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत आहे. याच अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.