- भोसरी पोलिसांनी ठोकल्या बिल्डरला बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- मिळकत विकसनासाठी घेतली. नोंदणीकृत विकसन करारनाम्यामध्ये ठरल्याप्रमाणे मिळकतीवर एस एस प्राईड नावाने (रेरा नं पी ५२१०००१४९९१) चार मजली गृहप्रकल्पाचे १८ महीन्यामध्ये बांधकाम पूर्ण न करता विकसन करारनाम्या मधील अटींचा भंग केला.
फिर्यादी यांच्या हिश्याच्या १४ फ्लॅटपैकी ०९ फ्लॅट फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करुन फिर्यादीची एकुण ४,१०,२०,००० रू. ची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सन २०१७ ते आजपर्यंत भोसरी येथील सर्व्हे नं. २१६, हिस्सा नं २, सिटी सर्व्हे नं ४३७८ यामधील एकुण क्षेत्र १०१८४ चौरस फुट या ठिकाणी घडली.
फिर्यादी जगन्नाथ नामदेव शेपाळ यांनी आरोपी मे. करूणेश बिल्डर्सचे रितेश गुलशनमल वासवानी याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. भोसरी पोलिसांनी ११५/२०२४ भा.द.वि.क. ४०६,४०९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि मोहारे पुढील तपास करीत आहेत.















