न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एम.टी.डी.सी) ला फिर्यादी यांनी संपर्क केला. बुकींग कॅन्सल करण्यासाठी मोबाईल नंबरवर संपर्क केला. त्यावेळी फिर्यादी यांना अव्वल डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास आरोपीने सांगितले. त्यामध्ये पुर्ण नाव, पत्ता व मोन व बॅकेचा अकांऊट नंबर टाकायला सांगितला.
दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलमधुन सर्व डाटा आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये चोरुन घेतला. फिर्यादीचा मोबाईल हॅक करुन, त्यांचा विश्वास संपादन करुन, विश्वासघात केला. फिर्यादीच्या समंतीशिवाय पैसे त्यांच्या अकांऊटमध्ये घेवुन स्वतःच्या फायद्याकरिता बँकेच्या खात्यातुन एकुण ७,४६,००० रुपये घेवुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि ०७/१०/२०२३) बावधन, पुणे येथे घडला. उल्हास पंढरीनाथ गुप्ते (वय ७९ वर्षे रिटायर्ड नेव्ही) यांनी आरोपी मो. नं. ७४३९३२६८८१ (पुर्ण नाव व पत्ता महित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी २२९/२०२४ भां.द.वि. कलम ४२०,४०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शेळके पुढील तपास करीत आहेत.















