न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- रंगाने काळी आहे तसेच लग्नाववेळी आरोपी नं १ पती हा नोकरीला आहे, असे खोटे सांगितले. तसेच वांरवार पैशाच्या कारणावरुन शिवीगाळ व मारहान केली. या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून फिर्यादीच्या २६ वर्षीय विवाहित मुलीने बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस आरोपींनी कारणीभुत केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०७/१२/२०२१ ते ०३/०३/२०२४) सासरी व कल्पवृक्ष अपार्टमेंट, डुडुळगाव येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी १) पती सुरेंद्र धमेद्र शेटे २) महिला आरोपी ३) दीर आकाश धमेद्र शेटे ४) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ९४/२०२४भा. द. वि. कलम ३०६,४९८ (अ), ३२३, ५०४,३४, ४१७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रणवरे पुढील तपास करीत आहेत.











