न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- ”दोन मुली झाल्या असल्यामुळे आम्हाला मुलगा पाहीजे होता, तु आमच्या वंशाला दिवा दिला नाहीस, तु मनहूस आहे, काळ्या पायाची आहे, तु आमच्या घराण्याला शोभत नाही” असे वारंवार बोलुन फिर्यादिच्या बहीणीचा शारीरीक व मानसिक छळ केला.
आरोपीने दारु पिवुन कर्ज फेडण्यासाठी माहेरुन पैसे घेवुन येण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादीच्या बहीणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे फिर्यादी यांच्या बहीणीने पतीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि.१७/०६/२०१४ ते दि.०२/०३/२०२४) गणेशनगर, थेरगाव येथे घडला.
फिर्यादी निशिकांत बबन तवंदकर यांनी आरोपी विशाल दादासाहेब शटके (वय ३४ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी २४८/२०२४ भा.दं. वि. कलम ४९८ (अ), ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.













