न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- मुलाचा वाढदिवस असुन कार्यक्रमासाठी पाचशे लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. त्यासाठी लागणारी ८०,००० रु किं ची वेगवेगळ्या प्रकारची भांडी विश्वासाने १२५० रुपये भाडेतत्वावर फिर्यादी यांनी आरोपीला दिली.
दरम्यान आरोपी याने सदरची भांडी परत न करता तसेच भाडे पण न देता आरोपीस वेळोवेळी फोन करुनसुध्दा मोबाईल फोन स्विच ऑप केला. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन त्यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि २६/०२/२०२४) प्रविण मंगल केंद्र व केटरर्स, सांगुर्डि फाटा, येलवाडी येथे घडली.
फिर्यादी संतोष किसन गाडे यांनी आरोपी विनोद सुर्यवंशी याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी १२४/२०२४ भा.द.वि.स. कलम-४०६,४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंदे पुढील तपास करीत आहेत.













