- गो अॅपमधून सर्व माहिती मिळणार आता एका क्लिकवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- पीएमपी बस सध्या कुठे आहे, ज्या बसस्टॉपवरून मी बसमध्ये बसणार त्याठिकाणी बस किती वेळात येणार, ही सर्व माहिती आता एका क्लिकवर कळणार आहे. एवढच नव्हे तर तिकीट काढण्याची सुविधाही पीएमपीच्या गो अॅपमधून मिळणार आहे. या अॅपचे काम अंतिम टप्यात आले असून, सुरक्षा तपासणी होताच काही दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर एका डेपोमध्ये ट्रायल सुरू केली जाणार आहे.
पीएमपीच्या बसचे लाइव्ह लोकेशन दिसणारी यंत्रणा गुगलसोबत विकसित केली जात होती. पण, तांत्रिक अडचणीमुळे हे काम पूर्ण झाले नाही. आता तर गुगल आणि पीएमपी यांच्यातील कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे पीएमपीने प्रवाशांना त्याच्या अॅपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती देण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी अॅपवर काम करत आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने जायचे, त्या बसचे शेडयुल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर तिकीट काढता येईल.















