न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- रहाटणी-श्रीनगर गुरुकुल कॉलनीत एक ते दिड वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रभागातील संबंधीत अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करून देखील तक्रारींचे निरसन होत नाही.
गुरुकुल कॉलनीतील नागरिकांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. चार दिवसांच्या आत कॉलनीतील नागरिकांचा पाणीप्रश्न न सोडविल्यास शिवसेना व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप दळवी यांनी दिला आहे. त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांना याबाबत निवेदन दिले आहे.













