न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर :- गेल्या दोन वर्षांपासून नाना काटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पवना नदी स्वछता मोहीम राबविली जाते.
याही वर्षी फाउंडेशनच्यावतीने पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील महादेव मंदिराच्या घाटावर गणेशभक्तांकडून गणेशमूर्ती व निर्माल्यदान विसर्जित न करता दानाच्या माध्यमातून फौंडेशनकडे जमा करण्यात आले.
नाना काटे यांनी केलेल्या ”पवना माय वाचावा” या आवाहनाची दखल घेत परिसरातील गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक अशा एकूण 12 हजार 300 गणेशमूर्ती दान करून मोहिमेस प्रचंड मोठा प्रतिसाद दिला.
नाना काटे सोशल फाउंडेशन या गणेशमूर्तीची पुनर्निर्मिती करून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून अनाथ आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविते तसेच इतर वंचित समाजपयोगी घटकास मदत करते असे नगरसेवक नाना काटे यांनी न्युज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.