न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात ”वैद्यकीय कक्ष” सुरू करा, अशी मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात महापालिका कर्मचारी, अधिकारी, पक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, पत्रकार व शहरातील नागरिक अशी एकूण काही हजारांवर संख्या कामानिमित्त येते.
अशा वेळी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना किंवा नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासल्यास महापालिका इमारतीच्या आवारात खाजगी तसेच सरकारी हॉस्पिटल्स नाहीत.
तातडीच्या वैद्यकीय उपचारांकरिता संत तुकारामनगरमधील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते व त्यास दिरंगाई झाल्यास रुग्णाचे बरे-वाईट होऊ शकते, अशा वेळी त्यास जबाबदार कोण?
त्यामुळे महापालिकेत तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता वैद्यकीय कक्ष असणे गरजेचे असून त्यात रुग्णवाहिकेसह वैद्यकीय उपचारांची सोय अंतर्भूत असावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते दत्त साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.