न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- घरात घुसून शिवीगाळ केली. हाताने फिर्यादीला मारहाण करीत नंतर बाहेर जावून दगडफेक केली. नैणेशकुमार यांना डाव्या हाताला, महेंद्रकुमार यांच्या डाव्या पायाला तर दोन महिलांना पाठीवर, मानेजवळ मारुन जखमी केले.
तसेच दगड फेकीमध्ये कॉन्ट्रॅक्टर काळे यांच्या कारचा आरसा फोडून नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ०४) रोजी रात्री ११.३० वाजता ओम साई सद्गुरु कुन्स्ट्रक्शन, पांढरकरनगर येथे बांधकाम साईटवर लेबर कॅम्पमध्ये, सुभाष पांढरकरनगर, आकुर्डी येथे घडली.
फिर्यादी निलेशकुमार रामसुमेर शर्मा यांनी आरोपी गोट्या व विकी भिसे व त्यांच्यासोबत आलेले इतर ३ अनोळखी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. निगडी पोलीस ठाण्यात ८७/२०२४ भा.द.वि कलम ४५२,३२३,३३७,४२७,१४३,१४७,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मणेर पुढील तपास करीत आहेत