- हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- ट्रॅक्टर व ट्रॉली हयगईने व अविचाराने, वाहतुक नियमाकडे दुर्लक्ष करुन आरोपी चालकाने भरधाव वेगाने रिव्हर्स गिअरमध्ये पाठीमागे चालवली. फिर्यादी यांचा पुतण्या वय १.५ वर्षे याला ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीची धडक देवून गंभीर जखमी करुन त्याच्या मृत्युस करणीभुत झाला आहे.
हा प्रकार (दि. ०४) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास जय हिंद कोलते पाटील लेबर कॉलनी, जांबे येथे लेबर कॅम्पमधील रोडवर घडली. फिर्यादी सिबुकुमार नेमुलाल शर्मा यांनी आरोपी ट्रॅक्टर क्रमांक एमएच १४ बी एम ०७१५ वरील चालक रितेश शिवलाल तुनगर (वय ३१ वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी २४५/२०२४ भा.द.वि कलम २७९,३०४ अ, मो.वा.का.क. १८४,११९/१७७, प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि सरडे पुढील तपास करीत आहेत.