न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- मोठमोठे दगड व सिमेंटच्या विटा हातात घेऊन ब्राउन रंगाच्या, घारे डोळे असलेल्या शेरु नावाच्या श्वानाच्या दिशेने फेकून मारल्या. त्यातील एक वीट शेरुच्या पोटाच्या मागे लागुन त्याला जखमी केले. परीसरात राहणाऱ्या इतर लोकांच्या जिवितास धोका निर्माण केला. सार्वजनिक ठीकाणी उपद्रव माजवत श्वानास मारहाण करुन त्याला उपद्रवी बनवुन तो इतरांना लोकांनादेखील चावा घेवु शकतो, अशा प्रकारे दगड मारला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०४) रोजी रात्री १०.२२ च्या सुमारास बाबासाहेब तापकीर बंगल्यासमोरील रस्त्यावर, राज तापकीर पार्कसमोर, तापकीर नगर, काळेवाडी येथे घडला. महीला फिर्यादीने आरोपी दिपक भागवत (रा. तापकीर नगर, काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात २५५/२०२४ भा.दं.वि. कलम ३३६, ५०६ सह प्राण्यास क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ (१) अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि नलावडे पुढील तपास करीत आहेत.