- तळेगाव दाभाडे पोलिसांची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- चोरीस गेलेले वाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभे आहे. अशी माहीती तळेगाव दाभाडे पोलीसांना मिळाली. तपास पथकाने त्या ठिकाणी जावुन तेथे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजुबाजुस चौकशी केली. हे वाहन उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे याने तेथे उभे केलेले असल्याबाबत समजले. त्यावरून लागलीच नमुद इसमाबाबत माहीती काढुन त्याला मारूती मंदीर चौक येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देवुन तळेगाव दाभाडे गावचे हद्दीतुन इतरही दुचाकी वाहने चोरल्याचे व ती वाहने त्याचा साथीदार लालु सखाराम मेंगाळ (रा. कॉलनी वाडी इंदोरे, ता. इगतपुरी) याच्या मदतीने नाशिक जिल्हयातील इगतपुरी व पालघर जिल्हयातील मोखाडा या भागात विक्री केली असल्याचे सांगितले. त्यावरून हद्दीतील वेगवेगळया ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासुन व आरोपीने दिलेल्या कबुलीप्रमाणे खात्री करून नमुद आरोपीने तळेगाव दाभाडे गाव व परिसरातुन चोरलेल्या दुचाकी वाहनांचे जप्ती कामी वरिष्ठांच्या परवानगीने तळेगाव दाभाडे पोलीस तपास पथकातील अधिकारी दोन्ही ठिकाणी गेले. इगतपुरी येथुन १०, मोखाडा येथुन ०४ तसेच तळेगाव दाभाडे गावचे हद्दीतुन ०५ याप्रमाणे एकुण १९ दुचाकी वाहने (सर्व दुचाकी वाहनांची अं. किमट ४,७५,००० रूपये) मुद्देमाल आरोपी त्या ठिकाणावरून जप्त करण्यात आलेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील गुन्हा एकुण ०९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. उर्वरीत वाहनांच्या अनुषंगाने गुन्हयाचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परि.०२ बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग देवीदास नेवारे, तळेगाव दाभाडे पोस्टे वपोनि किशोर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोउपनि रविंद्र कदम, पोहवा कोकतरे, पोशि कदम, सगर, ओव्हाळ, पोहीते, खेडे, मदने यांनी केलेली आहे.