न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे कॅन्सर (कर्करोग) रुग्णालय बांधण्यात येणार आहे. हे रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तत्त्वाने बांधण्यात येणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
थेरगाव येथील नवीन रूग्णालयाच्या शेजारी ३४ गुंठे रिकामी जागा आहे. त्या ठिकाणी पीपीपी तत्वावर ६० बेडचे अद्ययावत असे कॅन्सर रुग्णालय बांधण्यात येणार आहे. तेथे कॅन्सर उपचारासंदर्भात सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचे दर अल्प असणार आहेत. या रुग्णालयाची घोषणा आयुक्त शेखर सिंह यांनी अर्थसंकल्प सादर करताना गेल्या महिन्यात जाहीर केली होती.
रुग्णालय उभारण्यासाठी सीटीओ विभागामार्फत आरएफपी तयार करण्यात येत आहे. पीपीपी तत्वावर रुणालय बांधणे ही धोरणात्मक बाब आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची प्रशसकीय मान्यता आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.














