न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- समाजकल्याण विभागातर्फ स्प्रिंकलरसाठी १० टक्के, झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्य परिषदेच्या २० टक्के शेष फंडातून मागासवर्गीयांसाठी १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन दिली जाते.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे योजनांचा लाभ घेऊन मागासवर्गीय लाभार्थी आपले जीवनमान उंचावू शकतात. शेषनिधीतून झेरॉक्स मशीन, सिलाई मशीन यासह विविध लाभ दिले जातात. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मागविणे, त्यांची सोडत काढणे आणि त्यातून लाभार्थी निश्चित करणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले
स्प्रिंकलरसाठी १० टक्के अनुदान मिळत असून, तुषार सिंचनासाठीही अनुदान देण्यात येते, याशिवाय झेरॉक्स मशीनसाठी ५०० टक्के अनुदान दिले जाते.
सप्टेंबरपर्यंत अर्ज मागणी भरता येणार असून, नोव्हेंबरपर्यंत छाननी होणार आहे. डिसेंबर ते मार्च दरम्यान वाटप होणार आहे.
झेरॉक्स मशीन खरेदीसाठी मागासवर्गातील व्यक्तीला ७० हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान शेष फंडातून दिले जात असल्याने लाभार्थी निवडीची प्रक्रिया अत्यंत काटेकोरपणे पार पाडली जाते. यासाठी जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ती मागणीनुसार सादर करणे गरजेचे आहे.
अर्जदार मागासवर्गीय असावा, त्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे, अर्जदार १८ ते ६५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य देऊन लाभार्थीची निवड केली जाते. शिलाई मशीनचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मशीन खरेदीसाठी ५ हजार ७०० रुपयांचे अनुदान दिले जाते.















