- बांधकाम व्यवसायिकाची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२४) :- कंपनीमध्ये १ लाख गुंतवणुक केल्यास प्रति महिना १० हजार रुपये जास्तीचा नफा, असे बारा महिन्याचे मिळुन एक लाख वीस हजार रुपये नफा आणि मुळ मुद्दल १,००,००० असा एकुण २,२०,००० रुपये परतावा मिळेल, अशा आकर्षक योजनेचे आरोपीने फिर्यादी यांना आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीला एकूण ४३,००,००० रुपये रक्कम या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
आजपर्यंत फक्त ५,००,००० रुपये लाभांश फिर्यादीच्या भावाच्या खात्यावर आरटीजीएसव्दारे परत दिले. इतर कोणताही नफा/परतावा / लाभांश व मुळ मुद्दल परत न देता गुंतवणुकीच्या स्वरुपात ठेवी स्विकारुन फिर्यादीची ३८,००,००० रुपये व रकमेवर मिळणारा अधिकचा परतावा न देता तसेच फिर्यादीचे मित्र यांची १०,२१,००० रुपये व आणखी एकाची यांची ९,५०,००० रुपये अशी एकुण ५७,७१,००० रुपयाची फसवणुक केली.
त्याबरोबर फिर्यादीसारखेच अनेक गुंतवणुकदारांची अधिकच्या लाभाचे आमिष दाखवुन आरोपीने विश्वासाने सोपवलेली रोख व ऑनलाईन स्वरुपातील गुंतवणुक याची लाखो रुपयांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.३०/११/२२ ते १७/०४/२०२३) दरम्यान यंञा कपंनी, केंद्रीय विहाराच्या समोर, तापकीरनगर, मोशी येथे घडला आहे.
फिर्यादी राजेश रघुनाथ आमले (वय ४३ वर्ष धंदा बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी जितेंद्र मनोहर बल्लाडकर (वय अंदाजे ४८ वर्षे रा. तापकीरनगर, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १२२/२०२४ भादवि कलम ४०६, ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि इंगळे पुढील तपास करीत आहेत.













