न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :– नवनियुक्त पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या कार्यालयाकडून पिंपरी-चिंचवड शहरात ‘फोन अ फ्रेंड’ व ‘पोलीस आपल्या दारी’ या दोन संकल्पना राबविण्यात येणार आहेत.
”फोन अ फ्रेंड” या संकल्पनेत एखादी अनुचित घटना घडताना दिसल्यास नागरिकांनी पोलीस आयुक्तालयाचे नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक ०२०- २७४५०८८८ / ०२०२७४५०६६६ या क्रमांकावरती संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून नियंत्रण कक्ष पुढील माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देतील व कारवाई करतील.
”पोलीस आपल्या दारी” याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले, नागरिकांच्या तक्रारी व वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याकरिता नागरिकांनी लेटर बॉक्स द्वारे सूचना पाठवाव्यात. जेणेकरून आयुक्तालय आठवड्यातील एक दिवस ठरवून नागरिकांच्या समस्या सोडवतील.