न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- जांबेतील मारहाण प्रकरणात मारहाण झालेले सुरेश अडसूळ वय ५२, रा. जांबे या इसमाचे हृदय विकाराच्या धक्क्याने आज ( दि.२५ / सप्टें ) रोजी निधन झाले.
नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत निगडीतील रुग्णालयासमोर आरोपींवर खुनाचा आणि अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील यांनी नातेवाईकांची भेट घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.
आरोपी सुशांत गायकवाड, धर्मराज गायकवाड, चैतराम गायकवाड, आदित्य शिनगारे सर्व रा. जांबे, मुळशी यांना अटक करण्यात आली आहे.