- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीची भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.
शिवतारे यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत शिवतारे माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, फजल शेख यावेळी उपस्थित होते.















