न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- तडीपारीचा आदेश झुगारून आरोपी शहरात आला. बेकायदेशीरपणे त्याने स्वतःजवळ लोखंडी कोयता बाळगला. पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला (दि. २२) रोजी सेक्टर नं. ११ मोशी, प्राधीकरण येथील कंटेनर पार्कीगमधून ताब्यात घेतले.
रुपेश ऊर्फ संतोष सुरेश पाटील (वय ३२ वर्षे, रा. भोसरी) अशी अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४७/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. सन १९५१ चे कलम, १४२ ३७ (१) (३) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













