- स्व. अण्णासाहेब पाटील यांनी निर्माण केलेला माथाडी कायदा आमच्यासाठी वंदनीय -इरफानभाई सय्यद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- कष्टकरी गोरग़रीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्या अण्णासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद, परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, दादा कदम, गोरक्षनाथ दुबाले, समर्थ नाईकवाडे, चंद्रकांत पिंगट, अमित पासलकर, बबन काळे, मारुती कौदरे, श्रीकांत मोरे, अशोक साळुंखे, विश्वनाथ कदम. बालाजी खैरे, भारत मंजाळ, सोमनाथ फुगे, मनोज देवकर, चंदन वाघमारे, व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अभिवादन करताना कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले की, स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी माथाडी, मापाडी कामगार यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे यागावी जन्मलेल्या अण्णासाहेब यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मुबई गाठली. मुंबईत आल्यावर तेथे उसाच्या चारकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. नंतर दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे केली. ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे. त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा त्यांनी चालू केला व पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला. त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटन हे एक बलाढ्य संघटन म्हणून नावारूपाला आले. अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभ सारखे आहे. माथाडी कामगारांच्या कुटुंबीक, आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.













