न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- पत्नी-पत्नी दाम्पत्य दुचाकीवरून (दि. २१) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास पुणे-नाशिक रोडने जात होते. दरम्यान चिंबळी फाटा येथील शेल पेट्रोल पंपाजवळ हायवा गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादीचे चुलते भास्कर खताळ यांच्या डोक्यास, हातापायास मार लागला तर त्यांच्या चुलतीच्या डोक्यावरुन हायवा गाडीचे चाक गेल्याने त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी साईराज रोहिदास खताळ (वय २३ वर्षे) यांनी आरोपी हायवा गाडी (एम.एच.१४ के. ए.२७९८) वरील चालक लक्ष्मण किसन ढोकणे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी १६०/२०२४ भा.दं.वि कलम २७९,३०४ (अ), ३३७,३३८ मो. का.क. १८४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.













