- चिखलीत भाईगिरी; दुकानांवर दगडफेक, आरोपी मोकाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- ‘तु मला ओळखत नाही, मी मर्डरच्या गुन्हयात बाहेर आलो आहे, तुला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला ५,००० रुपये दयावे लागेल’ असे बोलुन दुकानाचे शटर जबरदस्तीने बंद केले. आरोपींनी दगडफेक केल्याने आजुबाजुचे दुकानदार दहशतीने आपली दुकाने बंद करुन पळापळ करु लागले. दुकानाजवळच्या परीसरात दहशत निर्माण केली. मीच दुकानाचा मालक आहे असे फिर्यादी यांनी म्हटले असता आरोपीने फिर्यादीकडे पाहुन ‘बरा झाला आलास, तुझीच वाट बघत होतो. तुला माझे हददीत दुकान चालवायचे असेल तर मला महिन्याला ५,००० रुपये दयावे लागेल, नाहीतर मी तुला धंदा करु देणार नाही,” अशी धमकी दिली.
फिर्यादीच्या दुकानाच्या आजुबाजुच्या दुकानदरांच्या दुकानावर दगड फेकुन ‘मला जर कोणी हप्ता दिला नाही तर, मी त्याला जिवे ठार मारील’ असे म्हणुन परिसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २३) रोजी रात्री ८.३० वा ते ९.१५ वा च्या दरम्यान नेक्स्ट लेवल मोबाईल अॅक्सेसेरीज नावाच्या दुकानासमोर, साने चौक, चिखली येथे घडला.
फिर्यादी शुभम धनंजय नाकिल (वय २६ वर्ष धंदा-व्यवसाय) यांनी आरोपी बापु कांबळे (पुर्णनाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी १६८/२०२४ भा.दं.वि कलम ३८७,५०४ क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मासाळ पुढील तपास करीत आहेत.