न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अहोरात्र परिश्रम घेवून १० महिन्याच्या कालावधीत २१२ मिसीग व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे.
मंगलोर, तेलंगणा, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार, तसेच राज्यातून २१२ मिसींग व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला. आयुक्तालयातील सर्वाधिक मिसींग पिंपरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी शोधून सदर व्यक्तीना कुटुंबाच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले.
याकामी पो. हवा. दत्तात्रय निकम व पो. हवा. शहाजी धायगुडे यांनी अहोरात्र कष्ट करुन ही कामगिरी केली आहे. दोघांनी सन २०२२-२०२३ या कालावधीत २६५ दिवसात ३६५ मिसिंग व्यक्तीचा शोध तसंच ३०० मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. म्हणून त्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.