न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन ईडीने केलेली अटक हा लोकशाहीवरील व भारतीय संविधानावरील खूप मोठा हल्ला आहे. देशातील विरोधी पक्षांना संपवण्याचे मोदी शहा यांचे हे षडयंत्र आहे. याचा सर्व देशभर निषेध होत आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आणि महायुतीचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सूडबुद्धीने इंडिया आघाडीतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यातूनच केजरीवालांना अटक, काँग्रेसची बँक खाती गोठवून इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या विजयापासून रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा करत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केले असल्याचे इंडिया आघाडीने संगितले.
यावेळी इंडिया आघाडीतील मानव कांबळे समन्वयक, मा. आ. गौतम चाबुकस्वार, कैलास कदम, तुषार कामठे, सचिन भोसले, चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, मीना जावळे आम आदमी पार्टी, कॉम्रेड गणेश दराडे माकप, कॉम्रेड अनिल रोहम भाकप, बी डी यादव समाजवादी पक्ष, अपना वतन संघटना सिद्धिक शेख, संभाजी ब्रिगेड प्रविण कदम, मराठा सेवा संघ आदी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.