- पिंपरी चिंचवड शहरातून मा. खा. अमर साबळे यांचाही समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे.
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, भुपेंद्र पटेल, विष्णू देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, रामदास आठवले, नारायण राणे, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, शिवराज चौहान, के. अण्णमलई, रवि किशन, मनोज तिवारी ही नावं आहेत.
तर महाराष्ट्रातल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांसह अशोक चव्हाण, अजित पवार, गिरीश महाजन यांचीही नावं आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातून मा. खा. अमर साबळे यांचाही समावेश आहे.