न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- दाम्पत्याचा विश्वास संपादन करुन त्यांच्यासोबत बांधकाम साईटमध्ये फ्लॅट विक्री करण्याबाबत व्यवहार केला. त्यांच्याकडुन रक्कम रुपये १९,९७,७१२ रोख व चेकव्दारे स्विकारले.
फिर्यादी यांना फ्लॅटचे खरेदीखत करुन देणे आवश्यक असताना बाधकाम साईटमध्ये सदर फ्लॅट नंबर नसताना सुध्दा फ्लॅट. नं.१०५ च्या फ्लॅटचा विक्री ग्राफ्ट तयार करुन फ्लॅट. नं.१०१ ऐवजी १०५ हा विक्री करुन बनावट दस्त क्रं. १६६९७/२०१७ तयार करुन फिर्यादी यांची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३१/०५/२०१६ ते आजपर्यंत) सह. दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी-२ हिंजवडी पुणे येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी शशिकांत बबन भिलारे (रा. म्हाताळवाडी, भुगाव रोड, पाण्याच्या टाकी शेजारी, पुणे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ४२९/२०२४ भा.द.वि. कलम. ४०६,४२०, ४६५,४६७, ४७१, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि धुमाळ तपास करीत आहेत.