न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- ‘आपले एमएनजीएलचे पेमेंट अपडेट होत नाही, ते अपडेट करण्याकरीता मी आपनास प्रोसेस सांगतो, त्याप्रमाणे अपडेट करा’. असे सांगुन फिर्यादी यांना प्ले स्टोरअर वरून customer app-zoho assist हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
ते फिर्यादी यांनी डाऊनलोड केले. त्यांना ट्रायल पेंमेट म्हणुन १०० रू. ट्रान्सफर करण्यास सांगितले. ते करत असताना फिर्यादी यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो त्यांनी आरोपीस शेअर केला. थोडयाच वेळेत फिर्यादी यांच्या गुगल पे मधुन एकुण ८९,०६८ रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेवुन फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार फिर्यादीच्या राहते घरी वाकड येथे घडला. फिर्यादी जयंत गनपतराव कानगुडे (वय ७७ वर्ष धंदा सेवानिवृत्त) यांनी आरोपी अज्ञात इसम (Sahid afridi 9050671918@paytm) पेटीएम बँक खाते धारक याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ४१८/२०२४ भा.द.वि. कलम ४०६, ४१९, ४२० सह माहिती तत्रंज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६सी ६६डी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि (गुन्हे) साळुंखे तपास करीत आहेत.