न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- संगनमताने कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्याचे फिर्यादी यांना तिघांनी खोटे सांगितले. त्यांना ‘एमडी’साठी डी वाय पाटील कॉलेज, पिंपरी येथे मॅनेजमेंट कोटयातुन अॅडमिशन मळवून देतो असे खोटे सांगुन त्यांच्याकडुन एकुण १९,७५,००० रुपये रोख स्विकारत त्यांचे अॅडमिशन न करता व पैसे परत न करता वेळोवेळी खोटे बोलुन त्यांची एकुण १९,७५,००० रुपयाची आर्थिक फसवुणक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना जानेवारी २०२३ ते आजपर्यंत लक्ष्मी हो सोसायटी, रुपीनगर, तळवडे व डि वाय पाटील कॉलेज समोर घडली. महिला फिर्यादीने १) विशाल पवार, २) भास्कर राव, ३) कुलभुषण कांबळे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलिसांनी १९५/२०२४ भा.द.वि. कलम ४२०, ४०६ नुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काकडे तपास करीत आहेत.