न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- महापालिकेत रुजू असलेल्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या झाल्याने जनता संपर्क विभाग प्रमुखाची जागा रिक्त होती. आता या विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
अण्णा बोदडे यांनी यापूर्वदिखील जनता संपर्क विभागात काम कले आहे. मात्र सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे या विभागाच्या प्रमुखांची नियुक्ती म्हणजे संगीत खुर्चीची स्पर्धा झाली होती. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले सहाय्यक आयुक्त मिनिनाथ दंडवते यांची लोकसभा निवडणुकीमुळे बदली झाली आहे.
त्यांना महापालिका प्रशासनाने कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे या विभागाचे कामकाज -विभागप्रमुखांशिवाय सुरू होते. बोदडे यांच्याकडे पुन्हा एकदा जनता संपर्क विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. बोदडे यांना क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकऱ्याचे काम करताना जनता संपर्क विभागप्रमुखाचे कामदेखील करावयाचे आहे.











