न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर, शिवतेजनगर येथे (दि. १०) रोजी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते ९ अभिषेक व होम हवन, दिवसभर विविध भजनी मंडळाची भजने तसेच सायंकाळी ७ वाजता महाआरती व १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सायं ७ ते १० वाजेपर्यंत “भक्तिरंग” या भक्ति संगीताचा सुरेल कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली आहे.