न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- मावळ तालुक्यातील आढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी शुभम निलेश सुतार याने खुल्या प्रवर्गातून जवाहर नवोदय परीक्षेत यश मिळविले आहे.
जवाहर नवोदय या परीक्षेत जिल्हयातून फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. आढे शाळेतील इयत्ता पाचवीच्या 13 विद्यार्थ्यापैकी 11 विदयार्थी या परीक्षेला बसले होते. यामधून शुभमची निवड झाली आहे. तो तालुक्यातील सर्व 693 विद्यार्थ्यांमध्ये पहिला मान मिळून नवोदयासाठी पात्र ठरला आहे. त्याची जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, पुणे येथे निवड झाली आहे.
या परीक्षेसाठी शुभमला वर्गशिक्षक अमित सारडा यांनी योग्य मार्गदर्शन करून जादा तास व प्रश्नप्रत्रिकेचे सराव करून घेतले.शाळेच्या मुख्याध्यापिका आरती दळवी व सहकारी शिक्षक केंद्राचे केंद्रप्रमुख ताते,विस्तार अधिकारी शोभा वहिले यांनी वेळोवेळी शुभमला मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवरंग सुतार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुतार, सरपंच सुनीता सुतार, शिव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पिंटु तिडके यांनी शुभमचे कौतुक केले.