न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- चिखली, कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकानांना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग एवढी भयंकर होती की या आगीत १०० पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
ही आग सकाळी सहाच्या सुमारास अटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्या, पुणे महापालिकेची १, चाकण नगर परिषदची एक, चाकण एमआयडीसीची एक, चिंचवड एमआयडीसी ची एक व टॅंकर अशा १५ ते १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.















