न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात अनुज्ञप्ती वाहन चाचणी करीता येणाऱ्या उमेदवारांच्या सर्व संवर्गाच्या अनुज्ञप्ती चाचण्या ८ एप्रिलपासून वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (आयडीटीआर), कलासागर हॉटेल जवळ, जुना पुणे-मुंबई महामार्ग येथे घेण्यात येणार आहेत.
वाहन चाचणी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून वाहन चाचणीचे कामकाज सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.













