न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवासी वाहनांना रस्ता उपलब्ध व्हावा याकरिता सहा एप्रिल ते नऊ एप्रिल असे तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे.
ही वाहने कडेला थांबवण्यात येणार आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहन चालक, मालकानी नमूद वेळेमध्ये वाहने आणू नयेत असे देखील आवाहन बोरघाट महामार्ग पोलिसांनी केले आहे.











