न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतुन दोन वर्षासाठी तरुणाला तडीपार केलं होतं. असं असताना कोणतीही परवानगी न घेता तो तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आढळून आला.
पोलिसांनी (दि. ०६) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास जय श्री स्वामी समर्थ इंजिनिअरींग कंपनी समोर, परशुराम चौक, निगडी येथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळुन आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस नाईक आतिष कुडके यांनी फिर्याद नोदविली आहे.
निगडी पोलिसांनी १७२/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५,१४२ ८ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निहाल महमद शेख (वय २५ वर्षे रा. मोहननगर चिंचवड) असं अटक आरोपीच नाव आहे. सपोफौ बोरसे तपास करीत आहेत.