- व्यवसायिकाची पोलिसात धाव; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- ९० गुंठे जागा आरोपी १ ते ४ यांच्याकडून फिर्यादीने दुय्यम निंबधक कार्यालय, खेड कार्यालयात सन १९९५ मध्ये रजिस्टर साठेखत केले होते. या जागेचा व्यवहार एकूण ३,९३,९७५ रूपयास ठरला होता.
ठरलेल्या व्यवहारपैकी एकूण ३,१०,००० रूपये रोख तसेच चेकव्दारे देवून शिल्लक राहीलेले ८३,९७५ रूपये पुनर्वसन कार्यालयाकडून परवानगी आणल्यानंतर पैसे देवून सदर जागेचे खरेदीखत करून देन्याचे ठरले होते. परंतु, आरोपी १ ते ४ यांनी पुनर्वसन विभागाची परवानगी न घेता तसेच फिर्यादी व फिर्यदिच्या भावास कोणतीही पूर्वकल्पना न देता आरोपी क्र २ व इतर लोकांनी सदरची जागा दोघांना दस्ताद्वारे खरेदीखताद्वारे विक्री करून फिर्यादी यांची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २८/१२/२००७) मरकळ, ता खेड जि पुणे गावत घडली. फिर्यादी विनित विजय कुमार (वय ५९ वर्ष) यांनी आरोपी १) रामचंद्र तुकाराम गोडसे, २) बाळासाहेब रामचंद्र गोडसे, ३) महिला आरोपी, ४) महिला आरोपी या चौघांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. आळंदी पोलिसांनी १०७/२०२४, भा.द.वि.कायदा कलम ४२०,४०६ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि दुधमल तपास करीत आहेत.