न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या सयुक्त जयंती महोत्सव निमित्त “रन फॉर भीमथोन” हि अर्ध मॅरेथॉन स्पर्धा तसेच बाल आनंद मेळावा छत्रपती संभाजी महाराज उद्यान समोर कोकणे चौक रहाटणी या ठिकाणी आयोजित केला होता.
प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग बारणे, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, मा. क्रीडा सभापती चंद्रकांत नखाते, मा. महिला बाल विकास सभापती निर्मला कुटे, उन्नती फौंडेशनचे संजय भिसे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार ह्यांचा हस्ते उदघाटन झाले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश नखाते, उल्हास कोकणे,डॉ. संग्राम नागणे, कैलाश कुंजीर, प्रदीप दळवी, काळुराम कवितके, राजेश भालेराव, पुरषोत्तम गाणार, अमित भालेराव, शशी जाधव, वैभव शिनगारे, मयुर ओव्हाळ, मोसीन अन्सारी , युवराज प्रगणे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हि अर्ध मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज उद्यान – बळीराज चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महादेव मंदिर – पि.के चौक – कोकणे चौक ह्या मार्गाने झाली असून ३४० स्पर्धकानी भाग घेतला होता, हि स्पर्धा बक्षीसा साठी नसून शांती, प्रेम, मैत्री आणि करूणा चा संदेश देण्या साठी आयोजन केले गेले होते. सर्व वयोगटातील समुदाया साठी तीन पाच किलोमीटर अंतरावर झाली असून प्रत्येकाला टी-शर्ट, चाय, पाणी, नाश्ता तसेच ऍम्बुलन्स आपत्कालीन सेवा व डॉक्टर, परिचारिका उपलब्ध करून देण्यात आली. बाल आनंद मेळावा मुळे सर्व बाल गोपालांना धमाल, मजा, मस्ती, मनोरंजन करता आले, अनेकांनी त्याचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार यांनी केले होते.