न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२४) :- आप-आपसात संगणमत करुन फिर्यादी यांच्या बहिणीकडे लग्नातील ५ लाख हुंड्याच्या पैशांची व चारचाकी गाडी घेण्यासाठी ८ ते १० लाख रुपयाची मागणी केली. फिर्यादी यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तीचा मानसिक व शारिरीक छळ केला. तिला शिवीगाळ व मारहाण करुन फिर्यादी यांची बहिण हिने तिचा नवरा व दिर आरोपी १ व २ यांच्या त्रासाला कंटाळुन त्यांनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
फिर्यादी यांची बहिण हिने घरातील बाथरुम मधील ऍसिड पिवुन आत्महत्या केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १५ डिसेंबर २०२३ पासून ते दि.०८/०४/२०२४ पर्यंत) संयोग कॉलनी, महर्षी महाविद्यालय जवळ, छत्रपती चौक, श्रीनगर, रहाटणी येथे घडला.
फिर्यादी आनंद कुमार रामसुरत पटेल यांनी आरोपी १) राहुल मुन्ना पटेल (वय २७ वर्ष, रा. रहाटणी), २) रोहित कुमार मुन्ना पटेल (वय २५ वर्ष) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४८०/२०२४ भा.द.वि. कलम ३०६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भारत माने तपास करीत आहेत.














